About बालोपासना
एकदा आईंच्या दर्शनार्थ गांवची परगांवची पुष्कळशी मंडळी जमली असता त्यातील काही बंधु-भगिनींनी आईंना विचारले, माझा मुलगा अभ्यास करीत नाही, फार दांडगाई करतो, संध्या करीत नाही, देवाला नमस्कार करायला सांगितल की तेही ऐकत नाही. उलट उत्तर देतो. तेव्हा यावर उपाय काय? तेव्हा आईंनी खास बाळगोपाळांसाठी "बालोपासना" नांवाचे प्रार्थनेचे छोटेसे पुस्तक छापले व येणार्या प्रत्येक भगिनींना देऊन मुलांची अंघोळ झाल्यावर मुलांकडून म्हणून घेण्यास सांगितले. त्यामुळे दिवसेंदिवस मुलांच्या स्वभावात बदल होत असल्याचा सर्वांना अनुभव आला. लहान मुलांकडून नियमीत प्रार्थना घडावी व त्यांचे भावी जीवन सुखमय व्हावे या उद्देशाने माताजींनी हे पुस्तक लिहिलेले असून त्यामध्ये गणेशस्तुती, हरिस्तुती, नारायणाष्टक, चोवीस नामावळी, गुरुपादुकाष्टक, यदुवीराष्टक, मानसपूजा, कृष्णाची आरती व विज्ञापना हे भाग आहेत.
by R####:
Its good app. only thing is that when i swipe left for 2nd page it gets stuck on that page. Also freq of the ads is high