गुरुवार नियोजक 2.0

गुरुवार नियोजक 2.0 Free App

Rated 5.00/5 (4) —  Free Android application by AnAppCan

About गुरुवार नियोजक 2.0

!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
स्वामीज्ञानप्रकाश गुरुवार नियोजक (Swamidnyanprakash Guruwar Niyojak)
श्री स्वामी समर्थ प्रबोधित ज्ञानाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामीज्ञानप्रकाश संकेतस्थळ सुरू झाले. त्यापुढे संकेतस्थळाची माहिती भक्तांना करून देण्याच्या उद्देशाने स्वामी समर्थांच्या प्रेरणेने गुरुवार-बोध नामक उपक्रम सुरू झाला. ह्या उपक्रमाद्वारे स्वामी प्रबोधनातील निवडक ज्ञानविचार दृकश्राव्य माध्यमाद्वारे एक एक करून, दर गुरुवारी भक्तांपर्यत पोचवले जातात. इ.स. 2015 मधे हा उपक्रम सुरू झाला. आज देखील गुरुवार बोध हा उपक्रम अव्याहत सुरूच आहे. एका वेळेस एक विचार ग्रहण करणे भक्तांना सुलभ वाटते. दृकश्राव्य माध्यमामुळे विचार ग्रहण करणे सोपे जाते. स्वामी समर्थांनी प्रबोधनाद्वारे सांगितल्या प्रमाणे, प्रत्येक भक्ताने ह्या ज्ञानविचारांच्या संदर्भात स्वतः विचारमंथन करून ज्ञानविचार आत्मसात करणे अपेक्षीत आहे. ज्ञानविचार निजी जीवनात वापर करण्याचा हाच राजमार्ग आहे.
बर्‍याच स्वामी भक्तांकडून गुरुवार-बोध उपक्रम आवडल्याचा प्रतिसाद आला आहे. हा उपक्रम सुरूच ठेवावा अशी सूचना भक्तांनी प्रदर्शित केली आहे. तसेच आधी प्रसिध्द झालेले सर्व गुरुवार-बोध संकलित करून एकत्र उपलब्ध व्हावेत अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. कांहिं भक्तांनी संकलनाचे कार्य केव्हांच सुरू केले आहे.
स्वामी भक्तांच्या इच्छेला मान देऊन, संकलित स्वरूपांत गुरुवार-बोध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, एक नियोजासाठीं उपयुक्त स्मार्टफोनवर वापरता येण्याजोगे अॅेप भक्तांसमोर थोड्याच दिवसांत प्रस्तुत करीत आहोत. त्या अॅहपसंबंधी सांगणारा हा लेख प्रपंच.
वर्षप्रतिपदेच्या शुभ दिनी ह्या अॅऊपचे उद्घाटन होईल. दुसर्‍यादिवशीं, स्वामी प्रगट दिनाच्या शुभ मुहूर्तापासून तो भक्तांना उपलब्ध होईल.स्वामीज्ञानप्रकाश संकेतस्थळावरून निःशुल्क आपल्या मोबाईल फोनवर डाऊनलोड करता येईल.
स्वरूपः- आठवड्याची नोंदवही. एका पानावर एक गुरुवार-बोध, एका पानावर एक आठवडा, सात दिवसांचे सात रकाने. वर्ष भराचे एकूण बावन्न आठवडे. बावन्न गुरुवार-बोध उपलब्ध आहेत.
उपलब्धसुविधाः-
1. अॅप उघडल्यावर प्रस्तुत आठवड्याचं पान उघडणार. शोधण्याची गरज नाही. महिन्या नुसार इतर आठवडे शोधण्याची सोय.
2. प्रत्येक गुरुवार-बोध स्वामिंच्या आवाजात ऐकण्याची सुविधा.
3. प्रस्तुत आठवड्याचा गुरुवार-बोध ऐकण्याची सोय.
4. प्रत्येक दिवसासाठी कार्य नियोजनाच्या नोंदी लिहिण्याची सोय. तसेच प्रत्येक नोंदीचा दिवस बदलण्याची सोय. पुढे ढकलण्याची सोय. परत नियोजन करण्याची सोय.
समग्र स्वामीभक्तांनी ह्या अॅुपचा लाभ घ्यावा. स्वामी प्रबोधित ज्ञानविचारांची टिपणे संग्रही असण्याचा फायदा घ्यावा. ह्या उपक्रमाला देखील स्वामिभक्तांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
सर्व स्वामीभक्ताच्या उत्कर्षासाठी स्वामिचरणीं प्रार्थना रुजू करून इथेच थांबतो.
अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त।श्रीस्वामीसमर्थमहाराजकीजय।

How to Download / Install

Download and install गुरुवार नियोजक 2.0 version 2.0 on your Android device!
Downloaded 10+ times, content rating: Not rated
Android package: mstechsolution.com.gurwarbodh_v04, download गुरुवार नियोजक 2.0.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.2+
n/a
Not
rated
Android app

App History & Updates

What's Changed
The new app brings गुरुवारबोध संकलन & लेख for year 2017.

What are users saying about गुरुवार नियोजक 2.0

A70%
by A####:

श्री स्वामी समर्थ