About Forts In Maharashtra / किल्ले
किल्ले म्हणजे तुम्हा आम्हासाठी मंदिरच. जिथे गेल्यावर आपल्या पूर्वजांचा इतिहास आठवून आपली छाती नकळत अभिमानाने फुलतेच.
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले:- १११.
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार - भुईकोट किल्ला, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग.
पर्यटन केल्याने किंवा जवळ्च्या अवतीभवतीच्या प्रदेशात भटकंती केल्याने त्या भूप्रदेशाचा भूगोल तर आपल्याला कळतोच पण त्या भूगोलापेक्षाही सुरस, मनोरंजक आणि थक्क करणारा इतिहासही आपल्याला कळतो. खरं म्हणजे इतिहासामुळेच आपल्याला भूगोल आवडू लागतो. एरवी एखाद्या प्रदेशाचा भूगोल म्हणजे अनेकदा कंटाळवाणे आणि रटाळ वर्णन, असा सर्वसामान्य माणसाचा समज होतो.
Download and install
Forts In Maharashtra / किल्ले version 1.0 on your
Android device!
Downloaded 5+ times, content rating: Not rated
Android package:
com.shreeapp.shreeapp2.maharashtrafort, download Forts In Maharashtra / किल्ले.apk