About Saksham
समदृष्टी, क्षमता विकास एवम् अनुसंधान मंडल (सक्षम) ही अखिल भारतीय संघटना 20 जून 2008 रोजी नागपुर महाराष्ट् येथे स्थापन जाली. सर्व प्रकारच्या विकलांगांचा सर्वांगीण आणि सर्वंकष् विकास साधुन त्यांना व्यापक दृष्टीने सामाजिक विकास व राष्ट्र उभरणीच्या कार्यात व प्रक्रियेत सामील करुन घेणे त्यासाठी त्यांना स्वाभिमानी, स्वावलंबी, सक्षम व समर्थ बनविणे हे या संघटनेचे ध्येय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही जगातील एकमेव संघटना असून देशातील 41 भागांपैकी (प्रांत) 35 भागात (प्रांत) सक्षमचे कार्य चालू आहे.
संपूर्ण देशभरात सक्ष्यमच्या वतीने व अन्य संस्थांच्या साह्याने 110हुन अधिक प्रकल्प निरनिराळ्या ठिकाणी चालू आहेत. यामध्ये नेत्रदान माहिती केंद्र, नेत्रदान संकलन केंद्र, नेत्रपेढ़या, दृष्टि बधितांच्या शिक्षण सहयासाठी श्राव्य व ब्रेल सहित्याची निर्मिती विकलांगांच्या परिवसनासाठी (पुनर्वसन) प्रयत्न करणे.
विकलांग - सकलांग तसेच विकलांग - विकलांग अशा विवाहास साहयभूत होणे. दारिद्रय रेषेखालील आणि गरजू विकलांगाना नियमित अन्न धान्य शिधा वाटप तसेच विकलांगानुकूल कालोचित, आधुनिक उपकरण यांची मदत करणे; असे विभिन्न स्तरावर विविध प्रकल्प सुरु आहेत.
अशा प्रकल्पांपैकी अजुन एक प्रकल्प पूणे येथे सुरु होत आहे. त्यामध्ये विकलांग व त्यांचे पालक यांच्यासाठी माहिती व संसाधन केंद्र असे त्याचे प्राथमिक स्वरुप आहे. विकलांगांची विकास प्रक्रिया खुंटवणाऱ्या असंख्य समस्यापैकी काही समस्या कायम स्वरूपी सोडविता याव्यात यासाठी ठोस कार्यक्रम सक्षम ठरवत आहे. त्यामध्ये विकलांगाचा सेन्सस, गणेश उत्सवात अवयवदान जागृती, रोजगराविषयी जनजागृति मोहीम राबविण्यांत येणार आहे. तसेच ठोस कृती कार्यक्रम म्हणून व्यापक "विकलांग रोजगार मेळावा 2015" पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे.
या जटिल व आव्हानात्मक जीवन जगणाऱ्या विकलांग व्यक्तीसाठी सक्षम हे सर्वांगीण मदतीचे व्यापक व्यासपीठ आहे. सदर कार्यात सर्व संवेदनशील नागरीक, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या सर्वानी एकत्रित योगदान केल्यास विकलांगांची "प्रभावी सेवा" होण्यास बलकटी मिळेल असा विश्वास वाटतो.
सक्षम व्यासपीठ आपल्या सेवा व सुचना यांचा आदर करते. कृपया आपल्या भावना "टिम सक्षम" पर्यंत पोहोवचविण्यासाठी esaksham@yahoo.co.in ह्या मेल वर पाठवाव्यात, ही नम्र विनंती ।
अधिक माहितीसाठी सक्षमचे संकेतस्थळ www.sakshamseva.org उपलब्ध आहे.