About अॅग्रोव्हिजन फाउंडेशन (Agrovision Foundation)
भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या उपजिविकेसाठी थेट शेतीवर अवलंबून आहे. मात्र अनेकदा शेतीत वापरले जाणारे, कालबाह्य झालेले तंत्र हे अधिक उत्पादन घेण्यात आणि एकूणच शेतीच्या व पर्यायाने शेतकऱ्यांच्या विकासात अडथळा ठरते. शेतीचा विकास करायचा असेल तर तर शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित करावी लागेल. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. यातूनच उत्पादनवाढ होईल, जोडधंद्याद्वारे अधिक उत्पन्न मिळेल आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे रहाणीमान उंचावेल. या उद्देशाने...
शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मुख्य प्रवर्तक मा. ना. श्री. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षांपूर्वी अॅग्रोव्हिजनचे आयोजन करण्यात आले. भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, शेतकऱअयांसाठी कार्यशाळा व एकदिवसिय परिषद आणि चर्चासत्र अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन अॅग्रोव्हिजनमध्ये दर वर्षी करण्यात येते.
लाखो शेतकऱ्यांचा सहभाग, नामांकित तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, शेती क्षेत्रात जगभरात सुरु असलेले संशोधन, नवे प्रयोग बघण्याची संधी तसेच शेती क्षेत्रात करिअर करु इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन अशा अनेक दृष्टीकोनातून सखोल माहिती देणारे हे प्रदर्शन शेती संबंधीत प्रत्येकाला स्मार्ट शेतीसाठी नवे व्हिजन देते.
आयोजक संस्था
अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, एमएम अॅक्टिव सायटेक कम्युनिकेशन्स, पुर्ती उद्योगसमुह, विदर्भ आर्थिक विकास परिषद (वेद) व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अॅग्रोव्हिजनचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, गुजरात आदी राज्य शासन आणि केंद्र व राज्य सरकारचा कृषी, पशुसंवर्धन आदी शासकीय विभागही आयोजनात सहभागी असतात. कृषी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या, संस्था प्रदर्शनाच्या प्रायोजक आहेत.
दिग्गज कृषिशास्रज्ञांमार्फत नियोजन
केंद्रीय कृषी शास्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ कृषीशास्रज्ञ डॉ. सी.डी. मायी हे अॅग्रोव्हिजनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. विदर्भ व मराठवाड्यातील कृषी व संलग्न विद्यापीठांचे कुलगुरु, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, केंद्रिय लिंबुवर्गिय पिक संशोधन संस्था, केंद्रीय मृद संशोधन व सर्वेक्षण संस्थांचे संचालक, विदर्भ आर्थिक विकास परिषद (वेद) व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष, श्री. नंदकुमार (माजी अध्यक्ष, एनडीडीबी), डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री (माजी रेशीम संचालक), डॉ. कृष्णा लव्हेकर (माजी कृषी आयुक्त), एम. जी. शेंबेकर (व्यवस्थापकीय संचालक, अंकुर सीड्स), व्ही. जे. आकर्ते (माजी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ) यांचा सल्लागार समितीत समावेश आहे.
by W####:
Can't access the app as it closed automatically just after the opening.