Savitri Srushti for Android
राजकारणाचा आणि सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत समिती चा काहीच संबंध नाही आणि भविष्यात राहणार सुद्धा नाही हीच शपथ घेऊन आपण एकत्र आलो आहोत आंनी म्हणूनच आपल्या उपक्रमांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो.
जे समितीमधील युवक राजकारणाशी जुळलेले आहेत ते कुठेही सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत समितीच्या कार्याचा स्वार्थासाठी वापर करत नाही अर्थात राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी स्वतंत्र ठेऊन काम करण्याची शपथ सर्वांना अनिवार्य आहे. नवीन सहकार्यांनी याची काळजी घ्यावी हि विनंती.
* नायगाव येथे भव्य "सावित्रीमाई सृष्टी " प्रकल्प उभा करणे.
* सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत यात्रा (माता जिजाऊ च्या माहेराहून-माता सावित्रीमाई च्या माहेरी) आयोजित करून आदर्श स्री व्यक्तीमत्वांच्या विचाराचा प्रसार करणे.
* समाजातील वंचित घटकांना मदत ( गरीब कुटूंब, आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, होतकरू मुले, गरिबांच्या मुलांचे शिक्षण ) विविध उपक्रमांमधुन करणे.
* उद्योग, रोजगार निर्मिती, स्रियांना स्वयंरोजगारासाठी मदत, समाज संघटन.
* महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे.
* शिक्षणाचे महत्व व सार्वत्रीकरणासाठी प्रयत्न करणेस्री जन्माचे व स्री भ्रूणहत्या विरोध चळवळ राबवणे
* विविध स्पर्धा, व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे व समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे
यांच्या संकल्पनेतून स्मृतीज्योत, आणि सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत समिती अंतर्गत अद्याप पर्यंत(०२/१२/२०१५) घेतलेले उपक्रम, उदा.
१) "जाणिव वेदनेची" या उपक्रमांतर्गत आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली.
२) "वृक्षरोपण सप्ताह" याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि जुन महिन्यात महाराष्ट्र भरात वृक्षरोपण सप्ताह राबवण्यात आला.
३) "स्मृतीज्योत यात्रा" (जिजाऊ माहेराहून - सावित्रीमाई च्या माहेरी)
Nice
by Y####:
Nice