iCompass (मराठी) चाचणी आवृत्ती for Android
कृपया समजून घ्या की आतमध्ये समुद्रात मोबाईलची रेंज मिळत नसली तरी जीपीएस हे सर्व ठिकाणी चालते. कारण त्याचे सिग्नल्स उपग्रहावरून म्हणजेच आकाशातून येतात . तेव्हा मोबाईलमध्ये जीपीएस चालू ठेवल्यास हा प्रोग्राम सर्व ठिकाणी चालतो.
ह्या प्रोग्राममुळे प्रामुख्याने इंधन आणि वेळ वाचू शकतो.
बाजारात अनेक सुप्रसिद्ध दिशानिर्देशानाची उत्पादने उपलब्ध आहेत. ते सामान्यतः इंग्लिश भाषेत असतात. त्यांना टच स्क्रीन नसतो व फक्त ४-५ बटणे दिलेली असतात . त्यामुळे ते वापरावयास फारच अवघड असते. तेव्हा हे अधिक वेगवान, वापरण्यास सोपे आणि अधिक अचूक आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये:
• पूर्णपणे मराठी भाषेत चालते . विशेष म्हणजे हा प्रोग्राम चेतावनीसुद्धा मराठी भाषेत बोलून सांगते.
• होकायंत्र उत्तर दिशा आणि जाण्याचे ठिकाण दाखविते
• बोट पाण्यावर किती हेलखावे खात आहे हे सुद्धा कळते (* मोबाईलमध्ये योग्य सुविधा असल्यास )
• भारतीय किनाऱ्यावरील बरीचशी स्थाने आधीपासून साठवलेली आहेत.
• तुमची ठिकाणे मराठी भाषेत सहज साठवू शकतात.
• पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि मालदीव या देशांची अंदाजे सागरी सीमा साठवलेली आहेत. जर तुम्ही त्या देशांच्या हद्दीजवळ गेल्यास हा प्रोग्राम तुम्हाला चेतावनी देतो.
• नकाशा उत्तर दिशेनुसार आपोआप फिरतो. तसेच नकाशावर तुमचे स्थान, जाण्याचे ठिकाण, तुमची साठवलेली ठिकाणे, घराचे किंवा बंदराचे ठिकाण, दुसऱ्या देशांच्या हद्दी दाखविले जाते.
• आपल्याला नेहमी घरापासून किती दूर आहात हे नेहमी दाखविले जाते
• जवळची ५ किनाऱ्यावरील ठिकाणे दाखवली जातात . त्यामुळे तुम्हाला किनाऱ्यावरच्या खुणा लक्षात ठेवायची गरज नाही . बरेच छोटे मच्छिमार बंधू रात्री खुणा दिसत नसल्यामुळे रात्री मासेमारीसाठी जात नाहीत . दिवसासुद्धा दुरून खुणा दिसत नसल्यामुळे ते समुद्रात जास्त दूर जात नाहीत. आता या प्रोग्राममुळे रात्री व समुद्रात दूर मासेमारीसाठी जाता येऊ शकते . तसेच जर काही आणीबाणी असल्यास पटकन पहिले जवळचे ठिकाण निवडता येते.
• काही ठिकाणी किनाऱ्यावरील खडकांमुळे, मच्छिमार बंधूंना बोट फार काळजीपूर्वक काढावी किंवा आत न्यावी लागते. ते काही खुणा वापरतात ज्या रात्री दिसत नाहीत. त्या खुणा ह्या प्रोग्राममध्ये साठवून ठेवता येतात.
• ५ जवळची तुम्ही साठवलेली ठिकाणेही दिसतात . त्यामुळे तुम्ही त्यावरून चांगले निर्णय घेऊ शकतात.
• तुम्ही असलेल्या ठिकाणाचे व घरच्या ठिकाणाचे सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त यांच्या वेळा मिळतात . घरच्या चंद्रोदय, चंद्रास्त वेळेवरून तुम्ही भरतीच्या वेळा काढून त्याप्रमाणे जास्त वेळ मासेमारी करू शकतात . बरेच मच्छिमार बंधू भरतीची वेळ माहित नसल्यामुळे किनाऱ्यापासून दूर थांबून भरती येण्याची वाट बघत बसतात . त्यामुळे वेळ फुकट जातो.
• कुठल्याही दिवसाचे चंद्रोदय, चंद्रास्त यांच्या वेळा मिळतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या दिवशी कुठल्या वेळी निघू शकतात किंवा जाऊ शकतात याचा निर्णय घेऊ शकतात.
• गतीनुसार पोहोचण्याचा अंदाजे वेळ मिळतो
• पोहोचण्याचे ठिकाण १ किलोमीटर , ५०० मीटर व जवळ आल्यास हा प्रोग्राम सावधान करतो .
सूचना :
चाचणी आवृत्ती १०० वेळा वापरता येते. किती वेळा वापरले हे वरती स्क्रीनवर दाखविले जाते. १०० वेळा वापरल्यानंतर आपल्याला जर हा प्रोग्राम आवडला तर मुख्य आवृत्ती विकत घेण्याची आम्ही विनंती करतो.
प्रोग्राम वापरण्याआधी कृपया याचे मार्गदर्शक पुस्तिका / मन्युअल वाचा . त्याचा खरोखर तुम्हाला फायदा होईल .
मन्युअल : http://icompassmarathi.weebly.com/uploads/3/0/8/7/30872671/user_guide_-_icompass_marathi.pdf
वेबसाइट : http://icompassmarathi.weebly.com/
*** This trial version shows ads. Full version is without ads. ***