About Click for Admission
आजवर शिव चरित्र किंवा शंभुचरित्र ऍनिमेशन मध्ये किंवा चलचित्रामध्ये पहिल्यांदाच विकसित होत आहे. ६ महिन्यांच्या अथक प्रयत्नातुन हे अनिमेशन तयार झाले.
आजचा तरुण, विद्यार्थी, शेतकरी हा बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, स्पर्धात्मक युगातील नैराश्य यामुळे ताणतणावात येऊन आत्महत्या, गुन्हेगारी सारख्या वृत्तीकडे वळण्याचे प्रमाण आज वाडीस लागले आहे. आणि याच प्रवृत्तीवर जर मात करायची असेल तर शिवाजी महाराजांचे संस्कार, कार्य-कर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले जे सर्वाना प्रेरणा देईल.
यामध्ये ३ तासाचे अनिमेशन ऑडिओ-विडिओ आहे, जे शिवचरित्र, शंभुचरित्र तसेच शिवकालीन इतिहास विभागात आहे.
शिवचरित्रात प्रामुख्याने जिजाऊमसाहेंबांचे संस्कार, शहाजीराजांची शिकवण, संघटन कौशल्य, मावळे घडविणे,स्वराज्याची स्थापना, औरंगजेब-अफजल खान, गडकिल्ले, संयमी वृत्ती, नेतृत्वगुण यावर आधारित प्रसंग यात समाविष्ट केले आहे. शिवाजी महाराजाच्या जन्मापासून तर मृत्यू पर्यंत तसेच मृत्यूनंतरचा इतिहास समाविष्ट आहे.
शिवचरित्रासोबतच शंभू चरित्र सुद्धा विकसित केले गेले जे १ तासाचे आहे आणि आजवर उपलब्ध नाही. शंभुचरित्रात शंभू महाराजांचा पराक्रम, संस्कार, धाडस आणि कर्तृत्व आपल्याला आभ्यासायला मिळते. रामशेजच्या किल्ल्याचा इतिहास, औरंगजेबाला आव्हान, सिद्धी जोहारशी लडाई, मृत्यूशी झुंज यांसारखे प्रसंग यात समाविष्ट आहे.
आजवर जो इतिहास ४थी च्या प;उस्तकातून भेटत होता तो आता अनिमेशन मध्ये आम्ही उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून शिवाजी महाराजांचे कार्य सर्वां समोर पोहोचेल.
by A####:
जय शिवराय... खूपच छान ॲप आहे... शिवरायांचा व शंभुराजेंचा इतिहास ॲनिमेटेड स्वरूपात प्रथमच बघतोय. खुपच चांगली संकल्पना आहे. Keep it up Arete Technology Team. जय शिवराय...