About एकटे जीव
श्री. अरुण कुळकर्णी यांचा “एकटे जीव” हा कथा संग्रह वाचला आणि त्या कथांनी मला एका आगळ्या वेगळ्या दुनियेची भ्रमंती करवून आणली. आगळ्या वेगळ्या अशासाठी की ज्या कोकण प्रदेशावर मी गेली अनेक वर्षे लिहीत आहे, त्याच प्रदेशातील मला अनोळखी असलेले अनेक पैलू श्री. अरुण कुळकर्णी यांच्या या कथांतून मला आढळले व मला ते वेगळे वाटले. त्याचप्रमाणे कोकणा बाहेरील ज्या प्रदेशातील लोकजीवनाचे त्यांनी आपल्या कथांमधे वर्णन केले आहे ते लोकजीवनही मला आगळे वाटले. त्या अर्थाने श्री कुळकर्णी यांचे लेखन खरोखरच आगळे वेगळे आहे.
by C####:
Very nice marathi short stories ...