About Kadodi
कॉपात , कुमारी
तुमश्या जकल्यां कादोडी अंका एनरॉइड ऍप वर स्वागत. मंडळी स सात वहरा अगोदर आपल्या कुपारी समाजाशी बोलीभाषा कादोडी यी बऱ्यास ठिकानी नवीन पिढीहरी बोयली जात नोती. दोन कादोडी बोलणारे माहाने तिराहित ठिकाणी एकत्र भेटल्यानंतर त्यांना आपापसात कादोडी मीने बोल्या लाज वाट्याशी. आपली भाषा , त्याशे जुने शब्द, जुन्यो कान्यो , जुन्यो चालीरीती , म्हणी हळूहळू नष्ट होयाशा मार्गोर लागलॉत्यो .
अह्या वेळेला कायिक तरुण पोरायी फेसबुक वर २०११ ला "आय बेट आय कॅन युनाईट १०००० कुपारी" ऑ कादोडी बोलीभाषा बोलणाऱ्यांकरिता ग्रुप काडलो. हेतू ओस होतो कि कादोडी भाषा आन संकृतीआ संवर्धन व्हावा. त्या ग्रुपवरती सक्रिय अहलेले समविचारी तरुण एकत्र आले आणि त्यायी "कुपारी कट्टा" स्थापन केलो. २०१२ शा एप्रिल मयन्यात एकमेकांना कत्तेस न भेटलेले २०/२२ जन एकत्र आले आणि त्यानंतर दर मयन्याला कुपारी कट्टा रंग्या लागलो. यात कादोडी आणि मराठी भाषेमिने लीविलेले लेख , कविता , ललित आणि संगीत सादर होया लागला. डॅनिअल, क्रिस्तोफर, एडवर्ड यामीनशे लेखक , कवी जागृत जाले. लॅरिसा, एन्सन, ग्रॅहॅम यां हारके कलाकार पुडे आले.
आन यास कुपारी कट्ट्यात ने "कादोडी" या अंकायी संकल्पना पुडे आली. ख्रिस्तोफर रिबेलो शा लीडरशिप खाला फक्त "कादोडी" भाषेमिने सादर केलेलो ऑ अंक सादर करन्या मांगे ऑ हेतू हॉथॉ कि फेसबुक वरती या समाजाशे जे कुन नात, त्यांना पन आपल्या बोलीभाषे मीने साहित्य उपलब्ध करोन द्या पाय. सुरवाती अंकांना समाजामीनने संमिश्र प्रतिक्रिया आल्यो. कुने चांगला हांगीला ते कुने साफसूफ वेड्यात काडला. पन "कादोडी" अंका संपादक मंडळ आपल्या पदर शे पैशे घालोन ऑ अंक काडीत रेले.
हळूहळू करोन लोकां मनामीने कादोडी बोलीभाषा बोल्यादो जो न्यूनगंड हॉतॉ तो निंगोन गेलो. घरशे बय बाबा आपल्या पोरां हरी अभिमानाने कादोडी भाषा बोल्या लागले. कुपारी सांस्कृतिक मंडळ, कुपारी महोत्सव इत्यादी गोष्टी सुरु जाल्यो.
आज आमाला "कादोडी" अंक एनरॉइड ऍपवर हाडताना खूप आनंद वाटाते. यात पयल्यापासून प्रकाशित जालेले अंक आमी डाउनलोड केल्यात. तुमी ते वासा आणि इतरांपर्यंत ते पोसवा. आणि तुमशे बरे वाईट मते आमश्या पोत नक्की कळवा
by M####:
Excellent team. Very nice work. Happy with this Christmas gift. Keep it up